Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिराग आणि पारस यांच्यातील भांडणावर निवडणूक आयोगाची कारवाई, एलजेपीचे निवडणूक चिन्ह जप्त

Webdunia
शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (17:42 IST)
चिराग पवन आणि पशुपती कुमार पारस यांच्यात सुरू असलेल्या वादात निवडणूक आयोगाने पक्षावर मोठी कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने लोक जनशक्ती पक्षाचे निवडणूक चिन्ह जप्त केले आहे.
 
चिराग पासवान आणि पशुपती कुमार पारस यांच्यात लोक जनशक्ती पक्षाच्या कब्जावरून सुरू असलेल्या वादात निवडणूक आयोगाने पक्षावर मोठी कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने लोक जनशक्ती पक्षा(एलजेपी)चे निवडणूक चिन्ह जप्त केले आहे. 

<

Election Commission of India (ECI) freezes Lok Janshakti Party's symbol amid tussle between factions of Chirag Pawan and Pashupati Kumar Paras pic.twitter.com/YmWQb5tyMe

— ANI (@ANI) October 2, 2021 >निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की पासवान किंवा चिराग या दोन्ही गटांना एलजेपीचे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. अंतरिम उपाय म्हणून आयोगाने दोघांनाही त्यांच्या गटाचे नाव आणि चिन्ह निवडण्यास सांगितले आहे, जे उमेदवारांना नंतर वाटप केले जाऊ शकते. 
 
राम विलास पासवान यांच्या मृत्यूनंतर पक्षात अंतर्गत कलह सुरू झाला. 16 जून रोजी चिराग पासवान यांच्या अनुपस्थितीत पाच खासदारांनी संसदीय मंडळाची बैठक बोलावली आणि हाजीपूरचे खासदार पशुपती पारस यांची संसदीय मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली. ही माहिती लोकसभा अध्यक्षांनाही देण्यात आली, दुसऱ्या दिवशी त्यांना लोकसभा सचिवालयातून मान्यता मिळाली.
 
17 व्या लोकसभेत एलजेपीचे एकूण सहा खासदार आहेत, त्यापैकी पाच खासदार पशुपती कुमार पारस, चौधरी मेहबूब अली कैसर, वीणा देवी, चंदन सिंह आणि प्रिन्स राज यांनी चिराग पासवान यांना सर्व पक्षीय पदावरून काढून टाकले. यानंतर त्यांनी चिरागचे काका पशुपती कुमार पारस यांना आपला नेता म्हणून निवडले होते.
 
 

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Show comments