Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वडिलांनी आपल्या जुळ्या मुलींना विष देऊन ठार केले, नंतर गळफास घेतला

Webdunia
सोमवार, 25 नोव्हेंबर 2024 (17:33 IST)
father committed suicide: पत्नीने दुसऱ्या पुरुषासोबत घर सोडल्याचा राग मनात धरून पतीने सोमवारी सकाळी आपल्या जुळ्या मुलींना विषारी दूध पाजून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.पोलिसांनी अशी माहिती दिली. 

सदर घटना औराई ठाण्याच्या उगापूर परिसरातील आहे. सोमवारी सकाळी गणेश चंद्र लाउधर महाविद्यालयाच्या झाडावर ओमप्रकाश यादव (27) मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला.
 
प्रभारी निरीक्षक अजित कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, मयत ओम प्रकाश याने 21 नोव्हेंबर रोजी पत्नी संगम यादव घरातून निघून गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली असून आपल्या 14 महिन्यांच्या जुळ्या मुलींनाअशी आणि प्रियांशी यांना  सांभाळले त्रासदायक होत होते. घरात मुलींचा सांभाळ करायला कोणीच नव्हते. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. 

अखेर त्याने टोकाचे पाऊल घेत आपल्या दोन्ही जुळ्या मुलींना दुधातून विष दिले या मुळे दोन्ही मुलींचा मृत्यू झाला नंतर त्याने गळफास घेण्याचे प्रयत्न केले.सकाळी 7 वाजेच्या सुमारास तो घरातून निघालेला काही लोकांना घरापासून 500 मीटरच्या अंतरावर गणेश महाविद्यालयाच्या गेटवर दिसला.

नंतर लोकांनी त्याला झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत बघितल्यावर घरी सांगण्यासाठी गेले असता तेथे हे दृश्य पाहून लोकांना धक्का बसला आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. श्रीवास्तव म्हणाले की, तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
Edited By - Priya  Dixit
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

पुढील लेख
Show comments