चेन्नईतील एका महिला निरीक्षकाने दाखवले दिले की, महिला कोणत्याही आघाडीवर कमी नाहीत. त्यांनी असे काम केले की पोलिस आयुक्तांनीही त्यांचे भरभरुन कौतुक केले.
राजेश्वरी नावाच्या या महिला इंस्पेक्टरने बेशुद्ध पडलेल्या एका व्यक्तीला खांद्यावर उचलून वाचवले आणि रुग्णालयात नेले. विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे चेन्नईची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. एएनआयने ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
आज वाटेत पडलेल्या एका बेशुद्ध माणसाला खांद्यावर उचलून मदत केल्याचे जिवाल यांनी सांगितले. या माणसाला तातडीने वैद्यकीय मदतीची गरज होती. राजेश्वरीने त्याला खांद्यावर उचलून हॉस्पिटलमध्ये नेले.