Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळले

Webdunia
शनिवार, 2 जुलै 2022 (16:27 IST)
केरळमधील कल्लंबलमजवळ शनिवारी सकाळी एकाच कुटुंबातील पाच सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

पोलिसांनी सांगितले की, कुटुंबप्रमुख एका खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला तर इतर चार सदस्य जमिनीवर पडलेले आढळले. त्यांनी विष प्राशन केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
मृतांमध्ये कुटुंबप्रमुख ,त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्याशिवाय आणखी एका महिला नातेवाईकाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
 
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "प्राथमिक तापसांती हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे आढळून येते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब काही आर्थिक समस्यांमुळे तणावाखाली  होते, परंतु आम्ही तपास करत आहोत, तपासा नंतरच काही निष्कर्ष काढता येईल ."

त्यांनी सांगितले की, या घटनेची बातमी त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली .ते सकाळी कुटुंबातील जवळचे नातेवाईक त्यांच्या घरी पोहोचले.या प्रकरणात पोलीस तपास करत आहे. 
 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments