Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धक्कादायक : मुलीची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा बलत्कार

Webdunia
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (15:34 IST)

मुंबई येथे संतापदायक  घटना घडली आहे. यामध्ये  विलेपार्ल्यात  १५ वर्षांच्या मुलीवर नऊ जणांनी बलात्कार केला असून हे उघड झाले आहे. या नराधमांनी त्या मुलीची मोबाईलवर  व्हिडीओ क्लीप तयार केली आणि यावरून तिला  ब्लॅकमेल करत वेळोवेळी  अत्याचार केला आहे. असे अतायाचार  करणाऱया या  नराधमांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  विलेपार्ले पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून यात भाजप युवा मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱयाचा समावेश आहे. त्यामुळे प्रकरण तापले आहे.

पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार,   दहावीत शिकणारी  अल्पवयीन मुलगी तिच्याच परिसरात राहणाऱया एका तरुणाच्या घरी अभ्यास करण्यासाठी नेहमी जात असे, मात्र आय तरुणाने घरी कोणी नसताना तिच्यासोबत  जवळीक साधली होती. तर तिच्या नकळत व्हिडीओ क्लिप बनवली होती. याच व्हिडीओ क्लीपने ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला होता. र लैंगिक अत्याचार करतानाची ही क्लीप आपल्या मित्रांना पाठवली त्याने पाठवली मग काय  एकाकडून दुसऱयाकडे अशी नऊ जणांपर्यंत ही क्लीप पोहोचली होती. मग हीच क्लिप घेत  सर्वजण मुलीला ब्लॅकमेल करत आणि अत्याचार करत होते. या सर्वांनी लैंगिक संबंध न ठेवल्यास क्लिप वायरल करू अशी  धमकी दिली होती. या मुलांच्या या वागण्याने ही  मुलगी प्रचंड घाबरली होती . याचाच गैरफायदा घेत नऊ जणांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तर जबर मानसिक आणि शारीरिक  धक्का बसलेली मुलगी वारंवारच्या लैंगिक अत्याचारमुळे आजारी पडली होती. तिने हा सर्व प्रकार आईला सांगितला. आईने विलेपार्ले पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली आहे. तीन अद्याप फरार असून ६ आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींना न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

पुढील लेख