गोवा विधानसभेच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता गड राखण्यासाठीच्या जोरबैठकांना ऊत आला आहे. आज शनिवारी गोवा विधानसभेसाठी मतदान होणार असून 17 मतदारसंघात अत्यंत अटीतटीची लढत होणार असल्याने सर्वच उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले आहेत.
गोव्याच्या रणसंग्रामात एकूण 251 उमेदवार उतरले आहेत. राज्यातील 11 लाख 10 हजार मतदार शनिवारी या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे. काही मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती होतील, तर 10 मतदारसंघांमध्ये थेट लढतीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दीपक ढवळीकर, मंत्री राजेंद्र आर्लेकर, मंत्री महादेव नाईक,दयानंद मांद्रेकर आदी मातब्बर नेते रिंगणात आहे.