Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चांगली बातमी !आता औषधे एटीएममधून दिली जातील,प्रेग्नेंसी किट देखील उपलब्ध होईल

Webdunia
शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (11:33 IST)
आता गावांमध्ये औषधे सहज उपलब्ध होण्यासाठी सरकार प्रत्येक क्षेत्रा मध्ये एटीएम बसवणार आहे. जिथे औषधे 24 तास उपलब्ध असतील. हे एटीएम आंध्र प्रदेश सरकारच्या एएमटीझेड कंपनीद्वारे यूपीच्या 822 ब्लॉकमध्ये हे लावण्यात येणार. AMTZ ला केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) सह करार केले आहे.चालू आर्थिक वर्ष 2022 च्या अखेरीस देशातील सर्व 6000 ब्लॉक्समध्ये औषध एटीएम बसवण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.
 
कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) नुसार, CSC चे आयुर् संजीवनी केंद्र ब्लॉक मध्ये चालू आहे. या केंद्रांवर औषधे वितरीत करणारे एटीएम बसवले जातील. प्रेग्नेंसी, कोरोना चाचणीसह इतर अनेक वैद्यकीय उपकरणे देखील या एटीएम केंद्रांवर ठेवली जातील. या मुळे गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध होईल. CSC यांचे संचालनासाठी इच्छुकांना प्रशिक्षण देईल. सीएससी गावांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर किंवा कॉन्सन्ट्रेटर देखील प्रदान करेल. कुठे काही रक्कम जमा करून, ते आणीबाणीच्या वेळी वापरले जाऊ शकते.
 
तत्काळ औषध उपलब्ध होईल:- CSC SPV MD म्हणाले की, गावकरी आधीच डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी वर्चूव्हल मार्गाने काम करत आहेत. औषधाचे प्रिस्क्रिप्शन आता वर्चूव्हल   पद्धतीने तयार केले गेले आहे. एटीएमची सुविधा मिळाल्यानंतर त्यांना लगेच औषध मिळेल. डॉक्टरांची स्लिप एटीएम मशीनमध्ये टाकली जाईल आणि त्यानुसार मशीनमधून औषध बाहेर येईल. ई-कॉमर्स कंपन्या मशीनमध्ये औषधे पुरवतील.बहुतेक जेनेरिक औषधे औषधाच्या  एटीएम मशीनमध्ये ठेवली जातील. याशिवाय, केंद्रामध्ये विविध प्रकारच्या चाचणी उपकरणांसाठी सुविधाही असतील.
 
यूपीमध्ये हेल्थ एटीएम सुरू करण्याची योजना: - तसे, जुलै 2021 मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामुदायिक आरोग्य केंद्र हेल्थ एटीएमच्या सुविधेने सुसज्ज असल्याची घोषणा केली होती. जिथे लोक या मशीनद्वारे स्वतःचे आरोग्य तपासू शकतील.रक्तदाब,पल्स रेट तापमान आणि ऑक्सिजन सोबत, शरीराशी संबंधित सर्व गोष्टी मोफत तपासल्या जाऊ शकतात.
 
हेल्थ एटीएमची कार्ये:- बॉडी मास इंडेक्स, रक्तदाब, मेटाबॉलिझ एज, शरीरातील चरबी,हायड्रेशन, पल्स रेट, उंची,मसल्स मास, शरीराचे तापमान, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण, हेल्थ एटीएमसह वजन यासह एकूण 59 मापदंड तपासून.त्वरित शरीर तपासणीसाठी, 16 पॅरामीटर्स तपासल्या जाऊ शकतात. जीवनशैलीशी संबंधित चाचण्या जसे ग्लूकोज, हिमोग्लोबिन, लिपिड प्रोफाइल इत्यादी देखील तपासल्या जाऊ शकतात. विविध प्रकारच्या रॅपिड टेस्ट, युरीन टेस्ट,गर्भधारणा,डेंग्यू,मलेरिया,टायफॉइड, एचआयव्ही तसेच 12 लीड ईसीजी,डिजिटल स्टेथोस्कोप,डर्मास्कोप,ओटोस्कोप यासारख्या चाचण्याही केल्या जातील.
 
ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन: या व्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य सेवा अधिक सुधारण्यासाठी एक विशेष हेल्पलाईन क्रमांक 14567 जारी करण्यात आला आहे. विशेष परिस्थितीत त्यांना रुग्णवाहिकेची गरज असो किंवा औषधाची गरज असो, सर्व काही पुरवण्याची योजना आहे. येत्या 8-10 महिन्यांत ते प्रत्यक्षात आणण्याची तयारी वैद्यकीय आणि आरोग्य विभाग करत आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments