Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून ग्रेनेड फेकत 6 हल्ले

Webdunia
बुधवार, 14 जून 2017 (11:59 IST)

काश्मीर खोऱ्यात मंगळवारी रात्री दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकत 6 हल्ले केले. यामध्ये एका सीआरपीएफच्या अधिकाऱ्यासह 13 जवान जखमी झाले. दहशतवाद्यांच्या शोधासाठी  काश्मीर खोऱ्यात मोहीम सुरु आहे.  जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संध्याकाळी साडे सहा ते रात्री साडे अकरापर्यंत दहशतवाद्यांनी सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलिस आणि लष्कराच्या सहा ठिकाणांना निशाणा बनवलं.  जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल, पडगामपोरा, पहलगाममधील सरनाल, सोपोरमधील पाजलपुरा आणि अनंतनागमधील सुरक्षरक्षक आणि लष्कराच्या ठिकाणांवर दहशतवाद्यांनी हल्ले केले. या घटनेनंतर काश्मीर खोऱ्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments