Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हनुमानजी मुस्लिम होते रोज करायचे नमाज, शिक्षकाच्या दाव्याने उडाली खळबळ

Webdunia
गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024 (14:11 IST)
बेगूसराय मध्ये एका खाजगी शाळेमध्ये एका मुस्लिम शिक्षकाने वर्गामध्ये शिकवतांना हिंदूंचे आराध्य देव भगवान हनुमानजी यांच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे.
 
समाजामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची मनाली जाते. शिक्षक हे उद्याचे उज्वल भविष्य घडवत असतात.ते मुलांना शिकवण्यासोबत चूक आणि बरोबर यांमधील फरक समजावत असतात. पण बिहारमधील बेगूसराय मधून एक बातमी समोर आली आहे. जिथे एका खाजगी शाळेतील शिक्षकाने हिंदूंचे पूजनीय दैवत हनुमाजींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, बेगुसराय येथील एका खासगी शाळेतील एका मुस्लिम शिक्षकाने वर्गात शिकवत असताना हिंदूंचे पूजनीय भगवान हनुमानजींबद्दल अत्यंत वाईट विधान केले. त्यांनी वर्गात शिकवत असताना हनुमानजी मुस्लिम समाजातील असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर हनुमानजी नमाज वाचत असत असे शिक्षकाने सांगितले.
 
शिक्षकाच्या या दाव्यानंतर शाळेत एकच खळबळ उडाली होती. मुलांनी घरी येऊन हा सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यामुळे पालक संतप्त झाले. आणि लगेचच शाळेत पोहोचून आक्षेप घेतला. गोंधळ वाढत असल्याचे पाहून शिक्षकाने माफी मागितली. तसेच शिक्षकाने माफी मागितल्यानंतर प्रकरण शांत झाले असून शाळा व्यवस्थापनानेही शिक्षकाला ताकीद दिली आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments