Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतात १९ कोटी लोक उपाशी तर 88,800 कोटी अन्नाची नासाडी

Webdunia
मंगळवार, 9 जानेवारी 2018 (11:06 IST)
आपल्या देशासाठी फार वाईट बातमी आहे. भारतात सर्वाधिक जास्त अन्नाची नासाडी होते. यामध्ये  संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषि संघटनेच्या (एफएओ) अलिकडेच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषि संघटनेच्या (एफएओ) च्या अहवालानुसार भारतात रोज 19 कोटी लोक उपाशीपोटी रहात असताना या देशात रोज 244 कोटींच्या अन्नाची नासाडी होते. याअनुषंगाने वर्षाचे गणित मांडले तर अन्नाच्या नासाडीचा आकडा 88,800 कोटी रुपयांवर जातो आहे, ही बाब आपल्यासाठी फार गंभीर आहे.संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषि संघटनेच्या (एफएओ) नुसार आपल्या देशात वाया जाणार्‍या अन्नामध्ये 21 दशलक्ष टन गव्हाच्या उत्पादनांचा समावेश आहे. तर दुसरीकडे  पीक काढणीनंतर होणार्‍या नुकसानीचा आकडा एक लाख कोटी रुपयांवर जातो आहे. म्हणजेच  एकूण तयार होणार्‍या अन्नपदार्थांपैकी दरवर्षी सुमारे 40 टक्के अन्नपदार्थ खराब होत असतात.संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषि संघटनेच्या (एफएओ) अहवाला म्हणतो की भारत लोकांना दरवर्षी 225 ते 230 दशलक्ष टन इतकी अन्नधान्याची गरज आहे. त्यात 2015-16 या सालात देशात 270 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन करण्यात आले होते. जागतिक भूक निर्देशांकात भारताची परिस्थिती फारशी चांगली नाही. 119 देशांमध्ये भारत 100 व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे 2016 सालातही एक अहवाल जाहीर झाला होता आणि त्यामध्ये ब्रिटनचे लोक जितक्या अन्नधान्याचा वापर करतात तितके अन्नधान्य भारतीय लोक वाया घालवतात, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे तुम्ही लग्नात किंवा घरी आणि टिपीन, हॉटेलात गेले असता अन्न कृपया वाया घालवू नका याच वेळी दुसरा कोणीतरी त्या अन्नासाठी उपाशी असेल.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments