Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्योगपती आनंद्र महिंद्रा यांची संतप्‍त प्रतिक्रिया

Webdunia
सोमवार, 16 एप्रिल 2018 (15:46 IST)
सोशल मीडियावर आपल्या शांत स्‍वभावामुळे ओळखले जाणारे उद्योगपती आनंद्र महिंद्रा यांनीही संतप्‍त प्रतिक्रिया दिली आहे. सूरतमधील प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद यांनी एक ट्‍विट केले आहे. "जल्लादाचे काम करण्याची कुणाचीच इच्छा नसते. परंतु, मुलींवर बलात्‍कार आणि हत्या करणार्‍यांना फाशी देण्यासाठी मी हे काम करण्यास तयार आहे. मी शांत राहण्याचा प्रयत्‍न करतो. परंतु, देशात अशा घटना घडत असताना माझं रक्‍त उसळतं," असे आनंद महिंद्रा यांनी म्‍हटले आहे.  
 
देशात एकामागून एक बलात्‍कारांची प्रकरणे उघड झाल्याने सामाजिक वातावरण ढवळून निघत आहे. उन्‍नाव आणि कठुआ प्रकणांवरून देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच रविवारी गुजरातमधील सूरतमध्ये अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍काराचे प्रकरण पुढे आले. यात ९ वर्षाच्या मुलीवर ७ दिवस अत्याचार केल्याचे आणि शरीरावर ८६ जखमा झाल्याचे तपासात आढळले. त्यामुळे उद्योजक आनंद्र महिंद्राही व्यथित झाले आहेत.  

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments