Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशात आयआयटी शिक्षकांची ३५ टक्के पदे रिक्त!

Webdunia
देशातील २३ आयआयटींमध्ये शिक्षकांची जवळपास ३५ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली असून, यामुळे या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचीही मागणी होताना दिसत आहे.
 
मध्य प्रदेशच्या नीमचचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांच्या आरटीआय अर्जाला मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिलेल्या उत्तरातून ही बाब समोर आली आहे. या माहितीनुसार १ ऑक्टोबर २0१६ च्या परिस्थितीनुसार देशातील २३ आयआयटींमध्ये एकूण ८२६0३ विद्यार्थी शिक्षण घेत असून, येथे ५0७२ शिक्षक कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये शिक्षकांची ७७४४ पदे मंजूर आहेत. म्हणजेच येथील २६७२ अर्थात ३५ टक्के पदे रिक्त आहेत. देशातील आयआयटींमध्ये शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर १:१0 अर्थात दहा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक ठेवण्याचा प्रय▪केला जातो. मात्र, सध्या आघाडीच्या २३ आयआयटींमध्ये १६ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक कार्यरत आहे. यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता 'सुपर ३0' चे संस्थापक आनंद कुमार यांनी व्यक्त केली आहे. आयआयटी मुंबईत ३0 टक्के, आयआयटी दिल्लीत ३५ टक्के, आयआयटी गुवाहाटीत २७ टक्के, आयआयटी कानपूरमध्ये ३७ टक्के, आयआयटी खरगपूरमध्ये ४६ टक्के, आयआयटी मद्रासमध्ये २८ टक्के, आयआयटी रुरकीमध्ये ४५ टक्के, आयआयटी बीएचयूमध्ये ४७ टक्के शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या आठ जुन्या आयआयटींमध्ये ६४४६७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे शिक्षकांची ६२५0 पदे स्वीकृत असून, केवळ ३९३५ शिक्षकच कार्यरत आहेत. तर आयआयटी भुवनेश्‍वरमध्ये ३५ टक्के, आयआयटी गांधीनगरमध्ये ११ टक्के, आयआयटी हैदराबादमध्ये १६ टक्के, आयआयटी जोधपूरमध्ये ३९ टक्के, आयआयटी पाटण्यात २0 टक्के, आयआयटी रोपडमध्ये २४ टक्के, आयआयटी पलक्कडमध्ये २८ टक्के, आयआयटी धनबादमध्ये शिक्षकांची ३६ टक्के पदे रिक्त आहेत. केवळ आयआयटी इंदूर आणि मंडीमध्ये स्वीकृत पदांपेक्षा जास्त शिक्षक कार्यरत आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments