Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिमाचलच्या किन्नौरमध्ये मोठा अपघात, बस वर दरड कोसळून 40 लोक अडकले

Webdunia
बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (15:18 IST)
हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये बुधवारी झालेल्या भीषण भूस्खलनानंतर बसवर दरड कोसळल्यामुळे सुमारे 40 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.उपायुक्त यांनी ही माहिती दिली.हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनीही विधानसभा अधिवेशनादरम्यान घटनेची पुष्टी केली आहे.किन्नौरमध्ये एका महिन्यापेक्षा कमी काळात  ही दुसरी मोठी भूस्खलन घटना आहे
 
बससह इतर पाच लहान वाहनेही या अपघातात अडकल्याची भीती आहे. दरड कोसळल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 हा ब्लॉक झाला आहे. बुधवारी दुपारी 12.30 च्या सुमारास हा अपघात झाला.हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन बस सोबत,एक ट्रक आणि एक वाहन देखील ढिगाऱ्याखाली दबलेले दिसत आहेत. 
 
बस व्यतिरिक्त इतर काही इतर वाहनेही ढिगाऱ्याखाली दबलेली आहेत.ढिगारा काढण्याचे  प्रयत्न सुरू आहेत, परंतु दगड आणि माती अजूनही मधून मधून पडत आहेत, या मुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे एनडीआरएफची टीम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक प्रशासनही बचाव कार्यात व्यस्त आहे.
 
उपायुक्त म्हणाले की, 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या हिमाचल रस्ते परिवहन महामंडळाच्या बससह इतर अनेक वाहनेही ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. हे वाहने किन्नौरमधील रेकाँगे पेओ वरून सिमल्याच्या दिशेने जात होते.
 
एनडीआरएफसोबतच स्थानिक बचाव पथकांनाही घटनास्थळी पाठविण्यात आले आहे.उपायुक्तांनी असेही सांगितले की आतापर्यंत खडकांमधून मोठ्या दरड कोसळत आहेत, या मुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments