Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बीफच्या निर्यातीमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकवर

Webdunia
सोमवार, 31 जुलै 2017 (08:40 IST)

बीफच्या निर्यातीत भारताचा जगात तिसरा क्रमांकवर आहे. पुढच्या दशकभरासाठी भारत बीफ निर्यातीत तिसराच राहण्याची शक्यता आहे असा अहवाल अन्न आणि कृषी संस्था अर्थात एफ.ए.ओ आणि ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन (ओ.ई.सी.डी.) या दोन संस्थांनी दिला आहे. या दोन्ही संस्थांनी २०१७ ते २०२६ या दशकभराचा अहवाल सादर केला आहे.   गेल्या वर्षी भारतानं १.५६ मिलियन टन बीफ निर्यात केलं, हेच प्रमाण येत्या काळात कायम राहिल असा अंदाज वाटतो आहे, असंही या अहवालात म्हटलं आहे. जगात जे बीफ निर्यात केलं जातं त्याचा १६ टक्के वाटा येत्या दहा वर्षांमध्ये भारत उचलेल असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. निर्यातीचं हे प्रमाण २०२६ पर्यंत १.९३ मिलियन टन इतकं झालं असेल असंही या अहवालात म्हटलं आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments