Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिखरजी बचावसाठी जैन समाज रस्त्यावर

Webdunia
मंगळवार, 3 जानेवारी 2023 (14:53 IST)
गिरीडीह (झारखंड)येथील सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळ करण्याच्या विरोधात जैन समाज रस्त्यावर उतरला आहे. सकल जैन समाजातर्फे  सकाळपासून कोल्हापूर दसरा चौक येथून मूक मोर्चाला सुरुवात झाली. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक महामोर्चा काढण्यात आला. या मूक महामोर्चासाठी कोल्हापूर, बेळगाव, सांगली, विजापूर जिह्यातील जैन श्रावक, श्राविका, आबाल वृद्ध, वक,युवती,नोकरदार,शेतकरी,व्यावसायिक,व्यापारी व सर्व सकल जैन समाजातील व्यक्ती सहभागी झाल्या आहेत.या महामोर्चात महिला भगव्या साडीत तर पुरुष पांढऱ्या कपड्यात दिसले.
 
झारखंड सरकारने श्री सम्मेद शिखरजी हे क्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केले आहे.परंतु सम्मेद शिखरजी हे समस्त जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेने याची पवित्रता नष्ट होणार आहे.सम्मेद शिखरजी हे पर्यटक क्षेत्र न राहता,तीर्थक्षेत्र म्हणून रहावे या मागणीसाठी,सकल जैन समाजाच्या वतीने मूक महामोर्चा काढण्यात आला. हा मूकमोर्चा दसरा चौक येथून,बिंदू चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,गुजरी,महाव्दार रोड,पापाची तिकटी,लुगडी ओळ,फोर्ड कॉर्नर,बसंत बहार रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाची सांगता झाली.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

पुढील लेख
Show comments