Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आक्षेपार्ह VIDEO लीक प्रकरणानंतर किरीट सोमय्यांचं नवं ट्वीट

Webdunia
मंगळवार, 18 जुलै 2023 (21:16 IST)
किरीट सोमय्या सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीने किरीट सोमय्या यांच्याशी संबंधित एक आक्षेपार्ह व्हिडीओ टीव्हीवर प्रसारीत केला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
 
या व्हिडीओमध्ये किरीट सोमय्या सदृश्य व्यक्ती पूर्णपणे नग्न होऊन अश्लील कृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पुढे आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी किरीट सोमय्या वर जोरदार टीका केली. यावर किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झाला नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना अशा आरोपांच्या व्हिडीओची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी अशी विनंती केली आहे,” असं किरीट सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं.
 
कथित आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण जोरदार चर्चेत असताना किरीट सोमय्या यांचं नवं ट्वीट चर्चेत आलं आहे. त्यांनी मुंबई महापालिका कोविड सेंटर घोटाळ्याबाबत ट्वीट केलं आहे. ते ट्वीटमध्ये म्हणाले, “आज जंबो कोविड सेंटर बांधण्याचं कंत्राट ‘ओक मेनेजमेंट कन्सल्टन्सी’ला देण्यासंबंधी फाईलची RTI अंतर्गत तपासणी केली. तसेच MMRCL मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.” या ट्वीटमध्ये किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलं आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या म्हणाले, “देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे.”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

पुढील लेख