Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चालत्या ट्रेनचे झोपेत महिलेने उघडल दार तिचा मृत्यू

Rajkumari Sharma
Webdunia
मध्य प्रदेशच्या अशोकनगरमध्ये एका महिलेला गाढ  झोपेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणात चालत्या ट्रेनच्या टॉयलेटचा दरवाजा उघडण्याऐवजी, मुख्य दरवाजा उघडल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे घरातील सवयी कश्या आपल्या अंगाशी येतात हे समोर आले आहेत. 

राजकुमारी शर्मा आणि त्यांचे पती राजेंद्र शर्मा  जोधपूर-भोपाल एक्स्प्रेसने प्रवास करत होते.  मुलाच्या नव्या फ्लॅटची वास्तूशांत अटोपून हे दाम्पत्य परतीचा प्रवास करत होते. दिवसभरच्या धावपळीमुळे दोघेही थकून गेले होते, त्यामुळे ट्रेनमध्ये लवकर झोपी गेले होते. यामध्ये  राजकुमारी   रात्री 10 वाजण्याच्या सुमारास टॉयलेटकडे जाण्यासाठी उठल्या होत्या . मात्र त्यांना प्रचंड झोप येत होती, त्या तश्याच चालत किलकिले डोळे करत  टॉयलेटजवळ असल्याचे समजून त्यांनी ट्रेनचा मुख्य दरवाजा उघडला, आणि एक पाय पुढे टाकला. पण काही कळायच्या आत त्यांचा तोल गेल्याने त्या धावत्या ट्रेनमधून खाली पडल्या.

ही बाब राजकुमारी यांचे पती राजेंद्र यांच्या लक्षात येताच, त्यांनी ट्रेनची चेन खेचून ट्रेन थांबवली. यानंतर ट्रेनच्या लोकोपायलटला सर्व माहिती सांगितली. लोकोपायलटने डीआरएमशी संपर्क साधल्यानंतर ती ट्रेन जवळपास एक किलोमीटर ट्रेन मागे नेली होती. मात्र यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. आपण घरी असताना अनेकदा झोपेत असे वागतो, मात्र अशी सवय जीव घेवू शकते हे नक्की.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

पुढील लेख
Show comments