Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यूपीच्या बाराबंकीमध्ये मोठा अपघात: बस आणि ट्रकच्या धडकेत 9 जण मृत्युमुखी,27 जखमी

Webdunia
गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (09:47 IST)
उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथील किसान मार्गावर दिल्लीहून बहराइचकडे जाणारी बस आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात नऊ बस प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेत 27 प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यातील 5 जणांना ट्रॉमा सेंटर लखनौ येथे पाठवण्यात आले आहे. अपघातातील मृतांचे शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. 
 
गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास दिल्लीहून बहराइचकडे जाणारी पर्यटक बस देवा कोतवाली परिसरातील किसान मार्गावरील बबूरी गावाजवळ पोहोचली. समोरून येणारा ट्रक अचानक त्याच्यावर अनियंत्रितपणे त्यावर येऊन आदळला. या धडक दरम्यान, वाहनांचा वेग इतका जास्त होता की बस आणि ट्रकचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलीस दल आणि तहसील प्रशासन घटनास्थळी पोहोचले. बस आणि ट्रक कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले जेथे डॉक्टरांनी नऊ लोकांना मृत घोषित केले. मृतांमध्ये रेहमान (42) मुलगा निजामुद्दीन रा. आलापूर बाराबंकी वगळता इतर कोणत्याही प्रवाशाची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनास्थळी पोहोचलेल्या डीएमने सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांना दोन लाख आणि जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments