Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिझोराममध्ये डॉक्टर आमदारांनी केली शस्त्रक्रिया

Webdunia
मिझोराममध्ये डॉक्टर असलेले  आमदार के. बैचुहा यांनी वेळेची गरज ओळखून शस्त्रक्रिया करून एका महिलेचे प्राण वाचले आहेत. डॉ. बैचुहा यांना त्यांच्या मतदारसंघातील एक महिला पोटातील वेदनेने विव्हळत असल्याचे समजले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी बाहेर गेल्याने तिच्यावर उपचार कोण करणार असा प्रश्न होता. जेव्हा आमदार बैचुहा यांनी त्या महिलेला तपासले. तेव्हा त्यांना महिलेला तात्काळ शस्त्रक्रियेची गरज असल्याचे लक्षात आले.  डॉ. बैचुहा यांनी लगेच इतर राजकीय कार्यक्रम बाजूला ठेवले व त्या महिलेवर शस्त्रक्रिया केली.

आता या महिलेची प्रकृती स्थिर आहे. डॉ. बैचुहा यांनी इम्फाळच्या रिजनल मेडीकल कॉलेजमधून पदवी मिळवली आहे. 1991 मध्ये वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर जवळपास 20 वर्ष त्यांनी डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस केली. 2013 मध्ये राजकारणात प्रवेश करुन ते आमदार झाले. शेकडो शस्त्रक्रिया करणा-या डॉ. बैचुहा यांनी आमदार बनण्यापूर्वी 2013 मध्ये शेवटची शस्त्रक्रिया केली होती.  
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments