Marathi Biodata Maker

मोदींनी केले नितीश कुमारांचे अभिनंदन

Webdunia
गुरूवार, 27 जुलै 2017 (11:04 IST)

नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नितीश कुमार यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेला अवघ्या देशाचा पाठिंबा आहे, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. विशेष म्हणजे नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर या प्रकरणावर भाष्य केले. त्यामुळे आता बिहारमध्ये भाजप नितीश कुमार यांना पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे.

‘भ्रष्टाचारविरोधी लढाईत सहभागी झाल्याबद्दल नितीश कुमार यांचे खूप खूप अभिनंदन. सव्वाशे कोटी जनता तुमच्या प्रामाणिकपणाचे स्वागत आणि समर्थन करते आहे,’ असे ट्विट पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments