गुजरातच्या वडनगर स्टेशनवरील ज्या चहाच्या टपरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लहान असताना चहा विकायचे तो स्टॉल लवकरच पर्यटन स्थळ बनणार आहे. त्या चहाच्या टपरीला पर्यटन स्थळ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे वडनगरमधील चहाच्या टपरीला आता लवकरच नवं रूप मिळणार आहे. यामुळे गुजरातमध्ये फिरायला जाणाऱ्या लोकांच्या पर्यटन स्थळांच्या यादीत या नव्या स्थळाची भर पडणार आहे.