Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदी आपल्या वाढदिवशी करणार या धरणाचे उद्घाटन

Webdunia
शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (15:00 IST)
पंडित जवाहरलाल नेहरु यांनी शिलान्यास बसवलेल्या सरदार सरोवर धरणाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वाढदिवशी म्हणजे उद्या १७ सप्टेंबर रोजी करणार आहेत. नर्मदा कंट्रोल अथॉरिटीने दिलेल्या सुचनेनुसार धरणाचे १७ जून रोजी बंद केलेले ३० दरवाजेही पंतप्रधान उघडतील. दरवाजे बंद केल्यावर धरणाची उंची १३८ मी पर्यंत वाढली तसेच या धरणाची जलसाठा क्षमता ४.३ दशलक्ष क्युबिक मिटर्स इतकी झाली. पुर्वी धरणाची उंची १२१.९२ मी. इतकी होती. धरणाबाबत बोलताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी म्हणाले की यामुळे १८ लाख हेक्टर्स जमिन ओलिताखाली येईल तसेच नर्मदेचे पाणी कालव्यांतून ९ हजार गावांमध्ये खेळवले जाईल’.
 
सरदार सरोवर हे अमेरिकेतील  ग्रँड काऊली धरणानंतर जगातील  सर्वात मोठे धरण आहे.या प्रकल्पाची पायाभरणी १९६१ साली झाली होती. अनेक कारणांमुळे त्याला विलंब होत गेला. मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनामुळे १९९६ साली धरणाचे काम थांबवण्याचे आदेश १९९६ साली देण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने २००० साली पुन्हा काम सुरु करण्याचे आदेश दिल्यानंतर धरणाचे काम पुन्हा वेगाने सुरु करण्यात आले.आता या प्रकल्पाचे उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments