rashifal-2026

मोदींचा आखाती देशात दौरा, रंगणार ऐतिहासिक सोहळा

Webdunia
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (16:12 IST)

येत्या 11 फेब्रुवारी रोजी विक्रमी संख्येने उपस्थित राहणाऱ्या भारतीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत.  फेब्रुवारी 9 ते 12 या दरम्यान हा दौरा असून मस्कत, ओमान इथं ऐतिहासिक सोहळा रंगणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

ओमानमध्ये मोदींविषयी प्रचंड कुतूहल असून मस्कतच्या सुलतान कुबूस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मोदींचं अनिवासी भारतीयांच्या सभेत भाषण ठेवण्यात आले आहे. ओमानमधलं हे सगळ्यात भव्य स्टेडियम आहे. पंतप्रधान मोदींचं भाषण ऐकण्यासाठी इथं खूपच उत्सुकता आहे असं ओमानच्या सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. अबू धाबीमध्ये पहिलं मंदीर बांधण्यात येणार असून या मंदिराच्या शिला – पूजन समारंभाची व्हिडीयो लिंकही मोदींना या दौऱ्यात बघायला मिळणार आहे. पश्चिम आशियातील हा दौरा मोदींसाठी या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या आखाती देशांमध्ये केवळ दुबईमध्ये हिंदूंचे एकमेव मंदिर आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख
Show comments