Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केरळमध्ये पसरला 'निपाह' आजार, हाय अलर्ट जाहीर

Webdunia
सोमवार, 21 मे 2018 (17:02 IST)

केरळमध्ये अत्यंत दुर्मिळअशा निपाहच्या विषाणूंच्या संसर्गामुळे होणाऱ्या महाभयंकर आजाराने थैमान घातलं आहे. केरळच्या कोझीकोड आणि मालापूरमध्ये या आजाराचा सर्वाधिक प्रार्दुभाव दिसतोय. निपाहच्या विषाणूंच्या संसर्गामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून २५ जणांना याची लागण झाली आहे.  दरम्यान, केरळमध्ये आरोग्य विभागाने हाय अलर्ट जाहीर केला आहे. केरळच्या आरोग्य मंत्र्यांनी केंद्र सरकारकडे या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत मागितली आहे. केंद्र सरकारने तात्काळ दखल घेतली. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी नड्डा यांनी डॉक्टरांची उच्चस्तरीय समिती नेमली असून तात्काळ हे पथक केरळला रवाना झाले आहे. केंद्रीय मंत्रायल केरळातील परिस्थितीवर विशेष लक्ष देत असल्याचेही नड्डा यांनी सांगितले.  

निफाह हा एका विशिष्ट प्रकराच्या वटवाघुळांच्या विषाणूमुळे होणारे इन्फेक्शन आहे. हे इन्फेक्शन माणसांना तसेच प्राण्यांनाही होऊ शकतो. सर्वात आधी हा विषाणू १९९८मध्ये मलेशियातील कापुंग सुंगई निफामध्ये सापडला होता. या विषाणूंचा संसर्ग सर्वात आधी डुक्करांना झाला होता. त्यानंतर तो माणसांपर्यंत पोहोचला. २००४ला बांग्लादेशमध्ये या विषाणूच्या संसर्गाने हाहाकार माजवला होता.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख