Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारी अधिकाऱ्यांच्या इलेक्ट्रॉनिक वाहनांचा अनिवार्य वापर होऊ शकतो नितीन गडकरी ह्यांनी संकेत दिले

Webdunia
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (18:01 IST)
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ह्यांनी शुक्रवारी मंत्रालय आणि विभागातील सर्व अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर अनिवार्य करण्याची वकिली केली. 
त्यांनी सरकार ला कुटुंबाला एलपीजी साठी सबसिडी देण्याऐवजी स्वयंपाकाच्या विद्युत उपकरणे खरेदी करण्यास मदत करावी अशी सूचना दिली आहे. 
 
'गो इलेक्ट्रिक' मोहिमेच्या शुभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले' अखेर आपण स्वयंपाकासाठी लागणाऱ्या विद्युत उपकरणांना सबसिडी का देत नाही? आपण एलपीजीवर सबसिडी पूर्वीपासून देत आहोत.
 
गडकरी म्हणाले '' इलेक्ट्रिक कुकिंग सिस्टम स्वच्छ आहे आणि या मुळे गॅसच्या आयातीवरील निर्भरता देखील कमी होईल. 
गडकरी ह्यांनी सर्व अधिकाऱ्यांसाठी देखील इलेक्ट्रिक वाहने अनिवार्य केले पाहिजे अशी सूचना दिली आहे.  
 
गडकरी ह्यांनी ऊर्जामंत्री आर के सिंह ह्यांना त्यांच्या विभागात अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहने अनिवार्य करण्याचे आवाहन केले. परिवहन मंत्र्यांनी आपल्या विभागासाठी हे पाऊले उचलू असे सांगितले. 
 
गडकरी ह्यांनी म्हटले की दिल्ली मध्ये सुमारे १०,००० इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केल्याने दरमहा 30 कोटी रुपयांची बचत होऊ शकते. 
या वेळी सिंग ह्यांनी जाहीर केले की दिल्ली -आग्रा आणि दिल्ली -जयपूर च्या दरम्यान 'फ्युल सेल'बस सेवा तूर्तच सुरु करण्यात येईल.
 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments