suvichar

प्रचार संपल्यावर नो जाहिरात, नो एक्झिट पोल , नो ओपिनियन पोल

Webdunia
महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर माध्यमांना जाहिराती देता येणार नाहीत. शिवाय 14 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीपर्यंत जनमत चाचणी (ओपिनियन पोल) आणि एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नाही. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. 
 
निवडणुकांचा प्रचार मतदान सुरु होण्यापूर्वी 24 तास अगोदर बंद होतो. त्यामुळे पहिल्या टप्पात 16 फेब्रुवारीला मतदान होत असलेल्या 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा प्रचार 14 फेब्रुवारी 2017 रोजी रात्री 12 वाजता संपणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 21 फेब्रुवारी रोजी मतदान होत असलेल्या 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा प्रचार 19 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजता संपेल. महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार मतदानाच्या 48 तास अगोदर बंद होतो. त्यामुळे 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणाऱ्या 10 महानगरपालिकांचा प्रचार 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता संपेल. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आयोगाच्या 14 ऑक्टोबर 2016 च्या आदेशानुसार राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रचाराच्या जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत. यात सोशल मीडियाचाही समावेश असेल, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. 
 
मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील जाहिरातींबाबत समान नियमन असावं, अशी मागणी काही राजकीय पक्षांकडूनदेखील करण्यात आली होती, असं सहारिया यांनी सांगितलं.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments