Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता संघाचा आयटी सेल, मुस्लिम मोहल्ल्यात शाखा उघडणार; मोहन भागवत

Now the team s IT cell will open a branch in a Muslim neighborhood  Mohan Bhagwat National marathi news in marathi webdunia marathi
Webdunia
बुधवार, 14 जुलै 2021 (09:38 IST)
चित्रकूट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिंतन शिबिराचा आज समारोप झाला. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं. मुस्लिम मोहल्ल्यांमध्येही संघाच्या शाखा निर्माण करण्यात येणार असल्याचं मोहन भागवत यांनी जाहीर केलं. तसेच आयटी सेल स्थापन करण्यात येणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं. त्यामुळे मुस्लिम वस्त्यांमध्येही आपला जम बसविण्याची संघाने तयारी सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे.
 
चित्रकूट येथे 9 जुलैपासून संघाचं चिंतन शिबीर सुरू झालं होतं. हे शिबीर ऑनलाईन होतं. त्याचा  समारोप करण्यात आला. यावेळी संघात अनेक छोटेमोठे बदल करण्यात आले आहेत. आगामी काळात अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे शिबीर अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. यावेळी पश्चिम बंगाल आणि मुस्लिम समुदायाला संघाशी जोडून घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments