Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Omicron चं नवीन लक्षण, शरीराच्या या भागावर करत आहे हल्ला

Omicron चं नवीन लक्षण  शरीराच्या या भागावर करत आहे हल्ला
Webdunia
शनिवार, 22 जानेवारी 2022 (15:41 IST)
कोरोना व्हायरसच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटमध्ये विविध लक्षणे दिसत आहेत. ज्यामुळे कोरोना आणि सामान्य फ्लूच्या लक्षणांमधील फरक समजणं कठीण झालं आहे. दरम्यान यूकेने नोंदवलेल्या 20 लक्षणांच्या ओमायक्रॉनच्या यादीमध्ये एक पूर्णपणे नवीन लक्षण दिसून आलं आहे, ज्यावरून याची ओळख करता येऊ शकते.
 
Omicron शरीराच्या अनेक भागांवर परिणाम करत आहे. हृदय, मेंदू, डोळे याशिवाय आता कानांवरही त्याचा परिणाम होत आहे. नवीन व्हेरिएंटमुळे कान दुखणं, मुंग्या येणं, बेल वाजणं किंवा शिट्टी वाजणे यासारख्या समस्या उद्भवत आहेत. विशेषत: पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांमध्ये हे लक्षणं दिसून येत आहे. व्हेरिएंटमुळे प्रभावित झालेल्या लोकांना थंडी वाजणे या सारखी लक्षणे देखील जाणवत आहेत. अशा परिस्थितीत वेळीच उपचार केल्यास ही समस्या बऱ्याच अंशी बरी होऊ शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी कोविडच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या कानाच्या अंतर्गत मॉडेलची चाचणी करून व्हायरसचा प्रणालीवर कसा परिणाम होतो हे जाणून घेतले. रुग्णांना कानात दुखणे, मुंग्या येणे अशी लक्षणे जाणवत असल्याचे त्यांना आढळून आले. जे कदाचित लोकांना हे देखील माहित नसेल की हे कोविडचे लक्षण आहे.
 
डॉ. कॉन्स्टेंटिना स्टॅनकोविक म्हणाल्या की, जर तुम्हाला ऐकू येणे, कानात आवाज येणं किंवा चक्कर येणं अशा समस्या येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा परिस्थितीत त्वरित कोविड चाचणी करा. अनेक रुग्णांमध्ये आम्हाला फक्त हियरिंग लॉस हेच कोरोनाचे लक्षण आढळले.
ALSO READ: Omicron Symptoms खोकला, सर्दी आणि ताप याशिवाय ओमिक्रॉनची ही आश्चर्यकारक लक्षणे आहेत, त्यांच्यापासून दूर राहा
याशिवाय ZOE कोविड लक्षण अभ्यासाचे प्रोफेसर टिम स्पेक्टर यांनी सन ऑनलाइनला सांगितलं की, हा व्हेरिएंट नाकाऐवजी तुमच्या आतड्यातही लपलेला असू शकतो. याचा अर्थ असा की जेव्हा लोकांना संसर्ग होतो आणि त्यांना पोटदुखी सारखी लक्षणे दिसतात. तेव्हा त्यांची कोविड चाचणी नकारात्मक येते. कारण नाक किंवा तोंडात ओमायक्रॉनचे कोणतेही ट्रेस नाहीत. ते म्हणाले की हा व्हायरस शरीराच्या वेगवेगळ्या भागात आढळू शकतो. अशा स्थितीत व्हायरस आतड्यावरही हल्ला करत असल्याची शक्यता आहे.
ALSO READ: Omicron प्रथम शरीराच्या या भागावर परिणाम करतं

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

पुढील लेख