Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

26/11 हल्ला करण्यामागे पाकिस्तानी दहशतवादी संघटना- दुर्रानी

Webdunia
मुंबईत झालेला 26/11 दहशतवादी हल्ला करण्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेचा हात होता अशी कबुली खुद्द पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहम्मद अली दुर्रानी यांनी दिली आहे.

'26/11 सीमापार दहशतवादाचं वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण असल्याचं', मोहम्मद अली दुर्रानी बोलले आहेत. दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी बोलताना मोहम्मद अली दुर्रानी यांनी जमात-एल-दावाचा दहशतवादी हाफिज सईदलाही चांगलंच फटकारलं आहे.

'हाफिज सईदचा काही एक उपयोग नसून त्याच्याविरोधात कारवाई करणं गरजेचं असल्याचं', दुर्रानी बोलले आहेत.  मुंबई 26/11 प्रकरणी भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा तपास करत जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदवर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करायला सांगितलं आहे.

पाकिस्तानने भारताकडे 24 साक्षीदारांना जबाब नोंदवण्यासाठी पाठवण्याचा आग्रह केल्यानंतर भारताने ही नवीन मागणी केल्याचं पाकिस्तान गृहमंत्रालयाच्या अधिका-याने सांगितलं. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments