Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

PM Kisan Yojana: किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता या दिवशी येईल! यादीत नाव तपासा

Webdunia
शनिवार, 28 मे 2022 (13:31 IST)
पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.आपल्या खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी पीएम किसानच्या खात्यात पुढील हप्ता येण्याची शक्यता आहे. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 1 वर्षात 3 हप्ते टाकते, जे दोन हजार रुपये आहे. म्हणजेच केंद्रातील मोदी सरकार वर्षभरात शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवते.
 
पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे आठ वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्त हिमाचल प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शिमला जाणार आहे. ते येथूनच किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता जारी करू शकतात. या निमित्ताने पंतप्रधान देशातील विविध क्षेत्रातील लाभार्थ्यांशीही बोलू शकतात. 
 
 पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकार दरवर्षी करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात  6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात. वास्तविक, ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी लागवडीयोग्य जमीन आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 
यादीत तुमचे नाव तपासा -
पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या संगणकावर पीएम किसान https://pmkisan.gov.in/ ची अधिकृत वेबसाइट उघडा. येथे फार्मर्स कॉर्नरचा पर्याय दिसेल. यानंतर लाभार्थी यादीच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. नवीन पृष्ठावर, तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाची माहिती भरा. त्यानंतर Get Report वर क्लिक करा. येथे तुम्हाला सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची यादी दिसेल.त्यात तुमचे नाव तपासा.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments