Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान मोदी बर्लिन मध्ये मुलासोबत खेळताना दिसले, जर्मनीत मोदीजी 'भारताची शान' अशा घोषणा

Webdunia
मंगळवार, 3 मे 2022 (16:02 IST)
जर्मनी दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीमध्ये दिसले. मोदींचे आगमन होताच भारतीय समुदायांमध्ये असलेला उत्साह पाहण्यासारखा होता. उपस्थित लोक मोदीजी, हमारा जीवन, भारत की शान अशा घोषणा देत होते. त्यानंतर पीएम मोदी तेथे पोहोचले. त्यांनी लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि एका लहान मुलासोबत मस्तीही केली. 
 
यापूर्वी जर्मनीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बर्लिन गार्ड ऑफ ऑनरनेही सन्मानित करण्यात आले होते. बर्लिनमधील पॉट्सडेमर प्लॅट्झ येथे भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी तरुणांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आज भारताच्या प्रगतीमागे तरुणाईचा मोठा हात आहे. पंतप्रधान म्हणाले की, आज भारताने आपला निर्णय घेतला आहे, संकल्प केला आहे. आज भारताला कुठे जायचे आहे, कसे जायचे आहे आणि कुठं पर्यंत जायचे आहे हे माहित आहे.
 
मुलासोबत मस्ती -
न्यूज एजन्सी एएनआयने पीएम मोदींच्या जर्मनी भेटीचा एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये पीएम मोदी एका मुलासोबत मस्ती करताना दिसत आहेत. पंतप्रधान तिथे पोहोचताच लोकांमध्ये घोषणाबाजी सुरू झाली - मोदीजी आमचे जीवन, भारताची शान आहे. घोषणाबाजीत पंतप्रधान लोकांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी लोकांचे अभिवादन स्वीकारले आणि एका मुलासोबत मस्ती करताना दिसले.

<

#WATCH | Prime Minister Narendra Modi shared a light moment with a child in Berlin, Germany earlier today pic.twitter.com/C4dH9S8CQB

— ANI (@ANI) May 3, 2022 >तत्पूर्वी जर्मनीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर ताशेरे ओढले. सुशासनाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, देशातील जनतेपर्यंत जास्तीत जास्त लाभ पोहोचावेत यासाठी भाजप सरकार प्रयत्नशील आहे. पीएम मोदी म्हणाले की, "आज भारतातील प्रशासनात तंत्रज्ञानाचा ज्या प्रकारे समावेश केला जात आहे, त्यावरून नव्या भारताची राजकीय इच्छाशक्ती दिसून येते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

पुढील लेख
Show comments