Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुरात

Webdunia
बुधवार, 9 जानेवारी 2019 (08:56 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अर्थात बुधवारी सोलापुरात येऊन विविध शासकीय योजनांच्या कामांचे भूमिपूजन, पायाभरणी व लोकार्पण करणार आहेत. या निमित्ताने इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी सुमारे ५० हजारांचा जनसमुदाय उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
 
मोदी यांच्यासमवेत केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हरजितसिंह पुरी, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता पंतप्रधान मोदी यांचे बीदर (कर्नाटक) येथून विशेष हेलिकॉप्टरने सोलापुरात आगमन होणार आहे. त्यानंतर पार्क स्टेडियमवर आयोजित सभेत विद्युत कळ दाबून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध सहा विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे. त्यानंतर ते सभेत जनसमुदायाला संबोधित करतील. सभेनंतर मोदी हे दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी  हेलिकॉप्टरने बीदरकडे प्रयाण करणार आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. वरकरणी हा शासकीय कार्यक्रम असला, तरी प्रत्यक्षात या सभेच्या माध्यमातून मोदी हे आगामी लोकसभा निवडणुकांचा शुभारंभ करणार असल्याचे बोलले जाते. ३६० कोटी रुपये खर्चाच्या उजनी धरण ते सोलापूर समांतर जलवाहिनी योजनेचे भूमिपूजन, स्मार्ट सिटी योजनेतील १९० कोटी खर्चाच्या पाणीपुरवठा व मलनि:सारण योजनेचे भूमिपूजन, महापालिकेच्या माध्यमातून अमृत योजनेअंतर्गत १८० कोटी खर्चाच्या भुयारी गटारींचे भूमिपूजन, सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या तीन एसटीपी प्रकल्पांचे लोकार्पण तसेच रे नगर फेडरेशनच्या माध्यमातून तब्बल ३० हजार असंघटित कामगारांसाठी उभारण्यात येणाऱ्या घरकुल प्रकल्पाची पायाभरणी आदी कार्यक्रम मोदी यांच्या हस्ते होणार आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments