Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रियंका आणि तिच्या आईचे नाव मतदार यादीतून वगळले

Webdunia
गुरूवार, 9 नोव्हेंबर 2017 (11:02 IST)

अभिनेत्री प्रियंका चोपडा आणि तिची आई मधू चोपडा यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. 

याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, ही कारवाई एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे. तक्रारीनुसार प्रियंकाचा परिवार गेल्या १७ वर्षांपासून या भागात फिरकलासुद्धा नाही. ते मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी जणूकाही हा परिसर कायमचा सोडला आहे. अशात त्यांना या भागात मतदानाचा हक्क का द्यावा? असा प्रश्न उपस्थित करीत या माय-लेकीचे नाव वगळण्याची तक्रार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर या दोघींचे नाव यादीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments