Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घटस्फोट घेताना कटूता विसरा : कोर्ट

Webdunia
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017 (16:29 IST)

पंजाबमधील पठाणकोटमधील एका कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोट घेणाऱ्या दाम्पत्याला कटूता विसरण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी  बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आणि दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांचं उदाहरणही दिलं. घटस्फोटानंतरही हृतिक रोशनचे त्याची घटस्फोटित पत्नी सुझान खानशी मैत्रीचे संबंध आहे. तसंच गौरी लंकेश यांचेही घटस्फोटित पतीसोबतचे संबंध चांगले होते, असं कोर्टाने सांगितलं.

सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल अनिल काबोत्रा यांचा घटस्फोटाचा अर्ज स्वीकारत कौटुंबिक कोर्टाचे न्यायाधीश रमेश कुमारी म्हणाले की, “हे जग अशा उदहरणांनी भरलेलं आहे, जिथे घटस्फोटित दाम्पत्य मित्र म्हणून राहतात आणि शांततने आयुष्य व्यतीत करतात. महत्त्वाची बाब म्हणजे बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचे घटस्फोटित पत्नी सुझान खानसोबत मैत्रीचे संबंध अजूनही कायम आहेत. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी हत्या झालेल्या पत्रकार गौरी लंकेश यांचेही घटस्फोटित पतीसोबतचे संबंध चांगले होते ” असे सांगितेल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

पुढील लेख
Show comments