suvichar

18 वर्षांची तरुणी बनली आई, 12 वर्षाच्या मुलावर गुन्हा

Webdunia
कोच्ची येथील कालामसरी पोलिसांनी 12 वर्षाच्या एका मुलाविरोधात 18 वर्षाच्या तरुणीला गर्भवती केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलावर ज्युवेनाइल जस्टिस कायद्याच्या कलम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
 
तरुणीने एका खासगी रूग्णालयात बाळाला जन्म दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्या रूग्णालयावरही गुन्हा दाखल केला आहे.

घटनेबाबत पोलिसांनी माहिती न दिल्याने पोलिसांनी रूग्णालयावर पॉस्को कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. ती तरुणी अल्पवयीन असून 1 वर्ष पूर्ण करण्यासाठी अजून दोन महिने बाकी आहेत, असे पोलिसांनी सांगितले. तर रूग्णालय प्रशासनाने तरुणीची 18 वर्ष पूर्ण झाल्याचे म्हटले आहे.
 
आम्हाला जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हाच आम्ही सामाजिक संस्थांना याबाबत माहिती दिली होती, तसेच तरुणीला 4 नोव्हेंबरला रूग्णालयातून डिस्चार्च मिळाल्यावरही आम्ही त्या संबंधीची सर्व कागदपत्रे सामाजिक संस्थांना सोपवली असे स्पष्टीकरण रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments