rashifal-2026

बचत खात्यातून आठवड्याला 50 हजारापर्यंत रक्कम काढता येणार

Webdunia
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017 (15:16 IST)
नोटाबंदी निर्णयानंतर बचत खात्यातून पैसे काढण्यावर घालण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात आले असून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. सोमवारपासून बचत खात्यातून आठवड्याला 50 हजारापर्यंत रक्कम काढता येणार आहे. याआधी  ही मर्यादा 24 हजार इतकी होती. येत्या 13 मार्चपासून बचत खात्यातून पैसे काढण्यावरील सर्व बंधनं मागे घेण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अगोदरच यासंदर्भात घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा करत 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. चलन तुटवडा असल्याने तसंच बँका आणि एटीएमबाहेर लोकांच्या रांगा लागल्याने बँक आणि एटीएममधून पैसे काढण्यावर निर्बंध लावण्यात आले होते.
सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख
Show comments