Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भीषण गर्मी घेत आहे बळी, मागील 72 तासांमध्ये ओडिसा मध्ये सन स्ट्रोकमुळे 99 लोकांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 3 जून 2024 (11:40 IST)
देशातील काही भागांमध्ये सूर्य आग ओतत आहे. या भीषण गर्मीमुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाढते तापमान रिकॉर्ड तोडत आहे. हीटस्ट्रोक आणि हीटवेव मुळे लोकांना रुग्णालयामध्ये जावे लागत आहे. हे वातावरण ओडिशा मध्ये आहे. सध्या ओडिशा नागरिकांना या गरम या गरम वातावरणापासून अराम मिळतात नाही आहे. भीषण उष्णता जीवघेणी ठरत आहे. ओडिशा मध्ये मागील 72 दरम्यान 99 लोकांचा सन स्ट्रोक मुळे मृत्यू झाला आहे. 
 
या 99 मृतांमध्ये 20 प्रकरणाची पुष्टि जिल्हाधिकारी व्दारा करण्यात आली आहे. ओडिशाचे विशेष राहत आयुक्‍त म्हणाले की, या भीषण गर्मीदरम्यान जिल्हाधिकारींनी सन स्‍ट्रोकमुळे झालेले मृत्यू 141 प्रकरण नोंदवले आहे, ज्यामध्ये 26 लोकांचा भीषण उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. बिहार मधील औरंगाबाद मध्ये निवडणूक ड्युटीवर हजर एक पोलीस शिपाईचा हीटस्ट्रोक मुळे मृत्यू झाला आहे. 
 
पंजाब आणि हरियाणा सोबत उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारताच्या 12 राज्यांमध्येउष्णतेची झळ कायम असण्याची शक्यता वर्तवली आहे. येत्या काही दिवसांमध्ये उष्णता वाढणार असल्याची माहिती मिळणार आहे. त्यांनतर हळूहळू कमी होईल. हवामान खाते रविवारी म्हणाले की, पंजाब, हरियाणा, चंडीगढ़, दिल्ली, जम्मू संभाग, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़ आणि ओडिशा मध्ये काही ठिकाणी सोमवारी उष्णता वाढू शकते. गेल्या 24 तसांमध्ये या राज्यांसोबत झारखंड मध्ये देखील प्रचंड उष्णता भडकली आहे.  

Edited By- Dhanashri Naik   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

पुढील लेख
Show comments