Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसटीकडून हंगामी भाडेवाढ जाहीर, 30 टक्क्यांपर्यंत झाली भाडेवाढ

Webdunia
शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (21:21 IST)
एसटी महामंडळाने दिवाळी निमित्त आता हंगामी भाडेवाढ जाहीर केली आहे. एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार, गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यांपर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही 20 ऑक्टोबर 2022 आणि 21 ऑक्टोबर 2022 रोजीच्या मध्यरात्री 12.00 नंतर प्रवास सुरु करणा-या प्रवाशांना सुधारित 10 टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येईल.
 
ही भाडेवाढ 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत राहील. सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू राहील. शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.
 
ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे, त्या प्रवाशांकडून वाहकाव्दारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. तसेच ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विदयार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. 1 नोव्हेंबरपासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील असे एसटी महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.
 
यंदा दिवाळीच्या सणात जोडून आलेल्या सुट्ट्या पाहता महामंडळाने दरवर्षी प्रमाणे नियमित बस फेऱ्या बरोबरच प्रवासी गर्दी लक्षात घेऊन 1494 जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. मध्यवर्ती कार्यालयातील वाहतूक खात्यामार्फत 29 सप्टेंबर रोजी सर्व विभागांना दिलेल्या आदेशानुसार जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.

Edited By-Ratandeep Ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments