Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यावर महासचिवाचा राजीनामा

Webdunia
बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (13:53 IST)
तामिळनाडू भाजपचे महासचिव केटी राघवन यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त मिळाले आहे.पक्षातील एका दुसऱ्या नेत्याने युट्युबवर स्टिंग व्हिडीओ व्हायरल केल्यावर त्यांनी राजीनामा दिला आहे.या व्हिडिओमध्ये यांच्या सारखाच एक व्यक्ती पक्षाच्या एका महिला कार्यकर्ते सहअश्लील व्हिडीओकॉल वर असल्याचे दिसत आहे.या व्हिडिओशी माझा काहीच संबंध नाही असे राघवन यांनी स्पष्ट केलं आहे.या प्रकरणाची कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत देखील त्यांनी दिले आहे.  
 
ते म्हणाले की माझी व पक्षाची प्रतिमा खराब करण्यासाठी कोणी हे मुद्दाम करत आहे.गेल्या 30 वर्ष पासून मी एकनिष्ठेने काम करत आहे.माझ्या पक्षाला आणि तामिळनाडूच्या जनतेला हे माहित आहे की मी कोण आहे.सकाळी मला सोशल मीडिया वरून एक व्हिडीओआला.माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हे कोणी करत आहे. या संदर्भात मी प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांच्याशी बोलून आपला पदाचा राजीनामा देत आहे.माझ्यावरील लावण्यात आलेले आरोप खरे नाही.न्यायाचा विजय होईल हा माझा विश्वास आहे. 
 
तामिळनाडूचे भाजपचे अध्यक्ष अन्ना मलाई म्हणाले की आम्ही या आरोपांकडे गांभीर्याने पाहत आहोत.पक्षाच्या राज्यसचिव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापित केले जाईल आणि या प्रकरणाचे सर्व तथ्य तपासले जातील.दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख