Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंध्र प्रदेशात रस्ते अपघातात सात ठार, 11 जखमी

accident
Webdunia
सोमवार, 30 मे 2022 (22:47 IST)
आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यातील रेंटाचिंतला येथे रविवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ता अपघातात सात जण ठार तर 11 जण जखमी झाले.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, क्षमतेपेक्षा जास्त लोकांना घेऊन जाणारी व्हॅन रेंटचिंतला येथील पॉवर स्टेशनजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला धडकली. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
या छोट्या व्हॅनमध्ये किमान 38 लोक होते, जे तीर्थयात्रा करून श्रीशैलमला परतत होते, असे पोलिसांनी सांगितले.
 
एका पोलीस अधिकाऱ्याने फोनवर सांगितले, “आम्ही अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी गुंटूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि सरकारने मृतांच्या नातेवाईकांना मदत आणि जखमींना चांगले उपचार मिळावेत अशी विनंती केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments