Marathi Biodata Maker

31 डिसेंबरला एका दिवसाचा दारु परवाना नाही

Webdunia
गुरूवार, 29 डिसेंबर 2016 (16:32 IST)
येत्या 31 डिसेंबरला एका दिवसाचा दारु परवाना न देण्याचे आदेश राज्य सरकारने महसूल खात्याला दिले आहेत. याआधी महामार्गापासून 500 मीटरच्या परिसरात मद्याचा वापर करता येणार नाही, असा आदेश उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टला पार्ट्यांचा बेत आखणाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. अनेकांना शहाराबाहेरचा रस्ता धरावा लागणार आहे. दुसरीकडे  शाहरुख खान आणि खिलाडी अक्षय कुमारने चाहत्यांना तसेच देशवासियांना नवीन वर्षांचे स्वागत करताना दारू पिऊन गाडी न चालवण्याचे आवाहन केले आहे. किंग खानने सोशल मीडियावर 'दारु पिऊन वाहने चालवू नका' असा संदेश दिला आहे, तर अक्षयनेही हाच संदेश देत ट्विटरवर 17 सेकंदांचा मोशल पोस्टर पोस्ट केला आहे. 'पार्टी का माहौल है, खूब पार्टी करो. मजनू बनके लैला के साथ नाचो, लेकिन शराब पीके गाड़ी मत चलाओ' असे शाहरुखने  20 सेकंदांच्या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे.  तर खिलाडी अक्षय कुमारनेही 'डोन्ड ड्रंक अँड ड्राईव्ह'चा संदेश दिला  आहे.
 
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments