Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरयूच्या काठावर श्रीरामाचा भव्य पुतळा उभारणार

Webdunia
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017 (16:56 IST)

अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर श्रीरामाचा १०० मीटर उंचीचा भव्य पुतळा बसवण्याची तयारी योगी सरकारकडून करण्यात येते आहे. ‘नव्य अयोध्या’ या योजनेअंतर्गत धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यासाठी यासंदर्भातला एक प्रस्ताव राज्यापाल राम नाईक यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. पुतळ्याची उंची १०० मीटर असण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप या उंचीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. 

राष्ट्रीय हरित लवादाच्या संमतीनंतरच या पुतळ्याचे काम सुरु केले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात लवादासोबत अद्याप कोणताही पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही अशीही माहिती समोर येते आहे.  अयोध्येचा विकास करण्यासंदर्भातील प्रकल्पाचा १९५.८९ कोटींचा आराखडा उत्तर प्रदेश राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. ज्यापैकी १३३.७० कोटींचा निधी केंद्राने राज्याला दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments