Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक : वडोदराच्या स्मशानभूमीत हाडांचे ढीग

धक्कादायक : वडोदराच्या स्मशानभूमीत हाडांचे ढीग
, गुरूवार, 8 एप्रिल 2021 (16:31 IST)
बुधवारी महाराष्ट्राच्या बीड येथून भयानक चित्र समोर आले ज्यात 8 शवांची एकच चिता तयार करुन अंतिम संस्कार केलं जातं होतं. ही केवळ एक घटना आहे. कोरोनाव्हायरस काळात देशाच्या अनेक जागेतून असे मार्मिक चित्र समोर येत आहे.
 
येथे आम्ही घटना सांगत आहोत वडोदरा येथील, जेथे एका स्मशानात हाडांचे ढीग ठेवल्या आहेत. या हाडांच्या पोटल्या घेण्यासाठी कोणीही येत नाहीये. मागील वर्षी देखील याप्रकारे हाडं गोळा करुन नदीत विसर्जित करण्यात आल्या होत्या. दुःखाची बाब म्हणजे 'मोक्षधाम' मध्ये ठेवलेल्या या अस्थींचं विर्सजन कधी आणि कशाप्रकारे होईल हे सांगता येत नाही.
 
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचे नातलंग दूर राहत असून स्मशानात त्यांच्यावर अंत्यंसंस्कार देखील घाटावर असणारे लोकंच करतात. कोरोनाच्या भीतिमुळे लोक अस्थि संचय करण्यासाठी देखील स्मशानात जात नाही, तसेच असेही अनेक शव असतात ज्यांचे वारसच नसतात.
 
वडोदरामध्ये एका स्मशात काम करणार्‍या व्यक्तीने सांगितले की जेव्हा अस्थि संचयसाठी लोकं येत नाही तेव्हा आम्हीच ते एकत्र करुन ठेवतो. नंतर एखाद्या संस्थेद्वारे किंवा शासकीय नियमाने त्याचं विसर्जन केलं जातं. असे केवळ वडोदरा येथे घडत नसून देशभरातून असे प्रकरणं समोर येत आहे.
 
उल्लेखनीय आहे की वडोदरा येथून धक्कादायक एक घटना अजून समोर आली होती जेव्हा कुटूंबाच्या मृत शरीराला स्मशानात घेऊन जाण्यासाठी शववाहन न मिळाल्यामुळे ठेल्यावर नेण्यात आलं. नगरवाडा प्रदेशापासून दीड किलोमीटर अंतरावर खासवाडी भागात स्मशानभूमी होती त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना दीड किलोमीटरपर्यंत मृतदेह ठेल्यावर ठेवून स्मशानभूमीपर्यंत जावं लागलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशातील सर्व नागरिकांना लस द्या- राहुल गांधी