Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पुण्याची श्रुती देशात पहिली

shruti vinod shrikhande
Webdunia
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018 (16:06 IST)

मुलींसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुलीनी त्यांचे कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. पुणे येथील श्रुती विनोद श्रीखंडे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ परीक्षेत  देशात पहिली आली आहे.  श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची मुलगीआहे. श्रुतीचे पुण्यातून लॉमध्ये शिक्षण घेतलं आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल  झाला. त्यात  तोंडी आणि लेखी परीक्षा असं या परीक्षेचं स्वरूप असून, या कठीण परीक्षेत श्रुतीने बाजी मारत पहिली आली आहे. आता श्रुतीला  चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये (ओटीए) तिला प्रवेश मिळणार आहे. सीडीएसमध्ये लेखी परीक्षा, मुलाखत हे दोन टप्पे आहेत. शारीरिक क्षमता हा तितकाच अधिक महत्त्वाचा भाग आहे. एप्रिल २०१८ पासून श्रुतीच्या प्रशिक्षणाला सुरुवात होत असून तिला सर्वांकडून खूप साऱ्या शुभेच्छा मिळंत आहेत. तर तिचे आई बाबा खूप खुश आहेत. मुलगा करणार नाही असा भीम पराक्रम तिने केला आहे. देशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments