suvichar

नोटांवर लिहू काही नका, सोनम गुप्ता कोणीही नाही !

Webdunia
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (10:14 IST)
सध्या व्हायरल झाले तर काहीही होऊ शकते हे सिद्ध झाले आहे. पूर्वी गावातील आवाजाने आणि शंकेने अनके दिवस गोष्टी पसरत होत्या मात्र आता सोशल मिडीया काहीपण पसरवत आहे असे समोर येते आहे. असेच काहीसा प्रकार नोटांवर लिहून होत आहे हो ! हे खरे आहे . कोण बिचारी सोनम गुप्ता असेल तिचा नावे  घेऊन आणि नोटेवर लिहून हिडीस बदनामी आणि नोटांची खराबी केली जात आहे असे समोर आले आहे.
नोटांवर कोणताही मजकूर लिहू नये, असं आवाहन वारंवार केलं जाऊनही अनेक जण त्यावर वाह्यातपणे लिहीत असल्याचं पाहायला मिळतं. नुकत्याच दोन हजार रुपयांच्या नोटा वापरात आल्या आहेत, मात्र नको तिथे ‘क्रिएटिव्हिटी’ दाखवण्याची  खोड इथेही मध्ये आली आहे. 
 
‘सोनम गुप्ता’ या नावाने सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घातला आहे. दोन हजारच्या नोटेपासून पाचशे, शंभर, दहा रुपयांच्या नोटांवर सोनम गुप्ताच्या बेवफाईचे दाखले पाहायला मिळत आहेत. अत्यंत चीड आणणारा हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र असे प्रकार आणि शेअरिंग हे केवळ मानसिक विकृती असून पोलीस आणि सायबर क्राईम ने या  गोष्टी शोधल्या पाहिजे असा सूर निघाला असून अने मागणी करत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments