Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यांची मारहाण करून हत्या

Webdunia
मंगळवार, 28 मे 2024 (12:48 IST)
Patna crime news : पटना विश्वविद्यापीठाच्या लॉ कॉलेज परिसरात काही अज्ञात हल्लेखोरांनी स्नातक शेवटच्या वर्षाच्या एका विद्यार्थ्यांला मारहाण करून हत्या केली आहे. ही घटना तेव्हा घडली जेव्हा विद्यार्थी दुपारी परीक्षा देऊन बाहेर आला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या संख्येमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. 
 
मृतकची ओळख पटना विद्यापीठ च्या बिएन कॉलेजच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी हर्ष राज वय 22 अशी झाली आहे. पोलिसांनी प्रकरण नोंदवून आरोपींची ओळख पटवून घेण्यासाठी सीसीटीवी फुटेजची तपासणी करीत आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार सुल्तानगंज क्षेत्र मधील लॉ कॉलेज परिसरात स्नातक ची परीक्षा द्यायला गेलेल्या एका विद्यार्थ्याला काही अज्ञात लोकांनी मारहाण करून जखमी केले. या घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली आणि पिडीतला रुग्णालयात घेऊन गेली. जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 
 
तेथील उपस्थित नागरिकांनी सांगितले की, जेव्हा हा विद्यार्थी परीक्षा देऊन बाहेर आला तेव्हा आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. व त्याला खूप वाईट प्रकारे मारहाण करण्यास सुरवात केली. दावा केला जात आहे की आरोपींची तोंड झाकले होते.  

Edited By- Dhanashri Naik   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

पुढील लेख
Show comments