Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

500 मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला अटक

Webdunia
दिल्लीमध्ये सात वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणार्‍या ३८ वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली आणि गाझियाबाद येथील शाळेत जाणार्‍या लहान मुलींना चॉकलेट आणि कपड्यांचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले होते. या नराधमाने आत्तापर्यंत 500 मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे त्याने चौकशी दरम्यान सांगितले आहे. 
 
पूर्व दिल्लीत एका 7 वर्षीय चिमुरडीवर 12 डिसेंबररोजी अज्ञात व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी न्यू अशोक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नराधमाने मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे असे सांगून त्या चिमुरडीला चॉकलेट आणि कपड्यांचे आमिष दाखवले आणि तिला निर्जनस्थळी नेले होते. त्यानंतर या ठिकाणी त्या नराधमाने चिमुरडीवर अत्याचार केला होता. जुने रेकार्ड्स तपासून त्याला अटक करण्यात आली.
 
रूद्रपुरमध्ये राहणारा हा आरोपी आपलं शिकार शोधण्यासाठी दिल्लीत येत होता. संपर्क क्रांती ट्रेनने तो उत्तराखंडहून लाल स्वेटर घालून दिल्ली येत होता आणि मुलींना शिकार बनवायचा. आरोपीचे पाच मुलं आहे त्यातून तीन मुली आहेत. 
 
अटक केल्यानंतर आत्तापर्यंत 500 मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची माहिती रस्तोगीने चौकशी दरम्यान दिली आहे. शाळेबाहेर लहान मुलींना गाठून वडिलांचा मित्र असल्याची बतावणी करत तो लहान मुलींशी बोलायचा.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments