Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वच्छ भारत’, ‘बेटी बचाओ’ आणि ‘नोटाबंदी’ पाठ्यपुस्तकांमध्ये

Webdunia
गुरूवार, 31 ऑगस्ट 2017 (17:40 IST)

मोदी सरकारच्या ‘स्वच्छ भारत’, ‘बेटी बचाओ’ आणि ‘नोटाबंदी’ यांसारख्या ऐतिहासिक निर्णयांचा  ‘एनसीईआरटी’च्या पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, या हेतूने ‘एनसीईआरटी’च्या पाठ्यपुस्तकांमध्ये या निर्णयांचा व योजनांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या केंद्र सरकारकडून शालेय अभ्यासक्रमामध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी सल्लागार म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) या स्वायत्त संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ‘एनसीईआरटी’कडून अभ्यासक्रमात बदल करण्याच्यादृष्टीने देशभरातून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार ‘एनसीईआरटी’ने विविध विषयांच्या १८२ पाठ्यपुस्तकांममध्ये बदल केले आहेत. त्यासाठी शिक्षकांनी केलेल्या २२१ आणि अन्य माध्यमातून आलेल्या १,११३ सूचनांची दखल घेण्यात आली. या सूचनांनुसार सहावी ते बारावी इयत्तेच्या विज्ञान विषयाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वाधिक ५७३, सामाजिक शास्त्र ३१६ आणि संस्कृत विषयाच्या पाठ्यपुस्तकात १३६ सुधारणा करण्यात आल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments