Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वामी आत्मस्थानंद यांचे निधन

Webdunia
पंतप्रधान मोदींचे गुरु आणि रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी आत्मस्थानंद (98) यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. रविवारी कोलकातामधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. स्वामीजींच्या निधानावर पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन आपला शोक व्यक्त केला आहे.पंतप्रधान मोदींनी स्वामी आत्मस्थानंद यांच्यासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, ”स्वामी आत्मस्थानंद यांच्या निधनानं माझं वैयक्तीक मोठं नुकसान झालं आहे. माझ्या जीवनातील महत्त्वाचा काळात मी त्यांच्या सानिध्यात होतो.”
याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही स्वामीजींना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदींनी वयाच्या 20 व्या वर्षी स्वामी आत्मस्थानंद यांच्याकडून दीक्षा घेण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यावेळी आत्मस्थानंद यांनी दीक्षा देण्यास नकार दिला, तसेच त्यांनी समाजसेवेचं व्रत अंगिकारण्याच सल्ला दिला होता.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments