Festival Posters

ताजमहाल पाहा, पण फक्त तीन तासांसाठीच

Webdunia
जगप्रसिद्ध वास्तू  असलेला  ताजमहाल आता पर्यटकांना फक्त तीन तासांसाठीच पाहाता येणार आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याने एक पत्रक काढून या संबंधीचे आदेश दिले आहेत. या पत्रकानुसार ज्या पर्यटकांना ताजमहाल बघायचा आहे त्यांना तिकिट घेतल्यापासून तीन तासांसाठीच ताजमहाल आणि ताजमहालाच्या परिसरात वावरता येणार आहे. पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी पुरातत्त्व खात्याने हा नवा नियम जारी केल्याचे समजते आहे.
 
पुरातत्त्व खात्याने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार जेव्हा पर्यटक ताजमहाल पाहण्यासाठी येतात तेव्हा ताजमहालाचं सौंदर्य पाहून मोहीत होतात आणि तिथून हलतही नाहीत. त्यामुळे अनेकदा इतर पर्यटकांना गर्दीत ताटकळावे लागते. पर्यटकांचा खोळंबा आणि गर्दी टाळण्यासाठी आता फक्त तीन तासच ताजमहाल पाहता येणार आहे. अनेकदा पर्यटक ताजमहाल सुरु पाहण्याची सुरुवात होते त्या वेळी हजर होतात आणि बंद व्हायची वेळ होते तेव्हा घरी जातात. पर्यायाने अनेक पर्यटकांना ताजमहाल पाहता येत नाही. अनेक पर्यटकांची निराशा टाळण्यासाठी आता तिकिट घेतल्यापासून तीन तासच ताजमहाल पाहता येणार आहे.
 
 या पत्रकानुसार ज्या पर्यटकांना ताजमहाल बघायचा आहे त्यांना तिकिट घेतल्यापासून तीन तासांसाठीच ताजमहाल आणि ताजमहालाच्या परिसरात वावरता येणार आहे. पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी पुरातत्त्व खात्याने हा नवा नियम जारी केल्याचे समजते आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments